माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे - पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:26 PM2020-04-06T16:26:55+5:302020-04-06T16:27:00+5:30

आपणही घरातच थांबून या लढ्याचे भागीदार व्हावे. " माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जळगाव जामोद येथे केले .    

My Health, My Responsibility "Everyone should adopt this fast - Superintendent of Police Dr. Bhujbal | माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे - पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ 

माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे - पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ 

जळगाव: देशात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन  विविध उपाययोजना राबवित आहे.  प्रत्येक नागरिक आपापल्या परीने कोरोना विरोधात लढा देत आहे. आपणही घरातच थांबून या लढ्याचे भागीदार व्हावे. " माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी  शनिवार 4 एप्रिल रोजी जळगाव जामोद येथे केले .           कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून" माझे आरोग्य, माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक" हा उपक्रम राबवण्यात येत आहे . या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक स्वतः ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती करीत आहे.त्या अनुषंगाने ४ एप्रिल रोजी त्यांनी  जळगाव जामोद  तालुक्यातील काही गावांना व शहरी भागांना भेटी दिल्या.                                      पोलीस अधीक्षक  हे ठीक ठिकाणी जाऊन लॉक डाउनचे पालन होत आहे की नाही, गावात संसर्गित व्यक्ती आहेत का?, किती लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे याची विस्तृत माहिती घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे यासंदर्भात जनजागृती करीत आहे. यावेळी  नगराध्यक्षा सीमाताई डोबे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे ,पोलीस निरीक्षक सुनील जाधव व त्यांचे सर्व पोलीस  अधिकारी , नगरसेवक श्रीकृष्ण केदार,  कैलास डोबे,  बाबुभाई जमादार,  सय्यद हुसेन डायमंड  आदींची  यावेळी  उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)   

गरजूंना  मदतीचा  हात  द्या-  आमदार डॉ. संजय  कुटे
लॉक डाऊन च्या  पृष्ठभूमीवर  काही  कुटुंबांकडे  जर  जीवनावश्‍यक वस्तूंची  टंचाई असेल  तर  अशा कुटुंबांना  इतरांनी  मदत करावी.  कारण कोणीही उपाशी  राहू नये  याची काळजी  शेजारच्या  व गावातील  कुटुंबांनी घेतळी पाहिजे, असे मत  माजी कामगार मंत्री  तथा जळगाव जामोद  मतदारसंघ चे आमदार  डॉ. संजय कुटे यांनी  व्यक्त केले. कोरोना  व्हायरस या  आजाराच्या पृष्ठभूमीवर  लॉक डाऊन मध्ये  आपण सर्वजण घरीच राहत असताना  घरातील वातावरण हे  आनंदी ठेवा, हसत-खेळत  व एकमेकांना मदत करीत  दिवस घालवा.  तसेच  पोलीस विभाग , आरोग्य विभाग , महसूल विभाग  व नगर परिषद विभाग  यांना  पूर्ण सहकार्य करावे आणि सोशल  डिस्टसिंग चा  नियम  नेहमी पाळा. आपण सर्वांनी घरात थांबूनच  कोरोना विरुद्ध युद्ध लढायचे आहे, असा सल्लाही  आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी दिला. आणि मतदार संघातील सर्व जनतेचे आभार मानले.

Web Title: My Health, My Responsibility "Everyone should adopt this fast - Superintendent of Police Dr. Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.