गर्भवती महिलांसाठी ‘माझं माहेर’
By admin | Published: July 19, 2014 12:22 AM2014-07-19T00:22:10+5:302014-07-20T02:02:24+5:30
आरोग्य विभाग : संग्रामपूर तालुक्यात वसाडी येथून प्रारंभ
संग्रामपूर : गर्भवती महिलांसाठी सकस आहार, नियमित उपचार व मार्गदर्शन याचा समावेश असलेल्या ह्यमाझं माहेरह्ण या नावीन्यपूर्ण उपक्रमाला १७ जुलै रोजी आदिवासी ग्राम वसाडी येथील अंगणवाडी केंद्रातून शुभारंभ करण्यात आला. यासाठी संग्रामपूरच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये १७ जुलैपासून प्रत्येक अंगणवाडीतील गरोदर स्त्रियांचे स्नेहशिबिर घेण्यात येतील. यामध्ये १,२९९ गरोदर स्त्रियांचा ताजा, सकस, आहार अंगणवाडीमध्ये दिला जातो. ज्यामध्ये लोकसहभागातून धान्य किंवा आर्थिक मदतीचा समावेश आहे. सोबतच गरोदरपणामध्ये महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन, एकमेकींशी मनमोकळ्या व आनंदी वातावरणामध्ये चर्चा, विरंगुळा व सहभोजनामुळे दोन घास जास्त खाल्ले जातात. हे माहेरीच शक्य असल्याने या उपक्रमाचे नाव माझं माहेर ठेवल्याची माहिती सर्मथ शेवाळे यांनी दिली. संग्रामपूर बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. यातील माझं माहेर या उपक्रमाला वसाडी येथून १७ जुलैपासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, जि.प. सदस्य नलिनीताई गावंडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्मथ शेवाळे, पर्यवेक्षिका इंगळे, लठाड, सोनगिरे, आवारे, लिपिक खंडाळे, अंगणवाडी कर्मचारी कांता इंगळे, कोकिळा पालेकर व गरोदर माता हजर होत्या. सर्वाच्या सहकार्याने व मदतीने हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करू व संग्रामपूर तालुक्याची वेगळी ओळख शासन स्तरावर निर्माण करण्याचा मानस शेवाळे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना व्यक्त केला.
*दर गुरुवारी होते स्नेह शिबिर
गरोदर स्त्रियांचे वजन व एचबीबाबतच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक आशा एएनएम, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. महिन्यातील प्रत्येक तिसर्या गुरुवारी स्नेह शिबिर व जेवण, प्रत्येक गुरुवारी शेंगदाण्याचे लाडू, राजगुर्याचे लाडू लोकसहभागातून वितरित केले जाणार आहे. हा उपक्रम नावीन्यपूर्ण म्हणून हाती घेण्यात आला व याची सुरुवात आदिवासी गावापासून करण्यात आली.