‘माय शिवबाची’ व्हिडिओ अल्बमचे प्रदर्शन १२ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:22 AM2018-01-11T00:22:05+5:302018-01-11T00:22:16+5:30
चिखली : ‘माय शिवबाची’ हा बहुप्रतीक्षित मराठी व्हिडिओ अल्बम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहे. तालुक्यातील गोद्री येथील राहुल साळवे या युवकाच्या गीताचा समावेश असलेल्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर लावून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : ‘माय शिवबाची’ हा बहुप्रतीक्षित मराठी व्हिडिओ अल्बम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहे. तालुक्यातील गोद्री येथील राहुल साळवे या युवकाच्या गीताचा समावेश असलेल्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर लावून आहेत.
उन्मेष तायडे फिल्म्स व ऑरेंज म्युझिकच्या विद्यमाने प्रदर्शित होणारा मराठी संगीत अल्बम ‘माय शिवबाची’ विषयीची माहिती ग्रोदी येथील राहुल साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अवघ्या मराठी मनाला वेड लावणार्या या गाण्याचे बोल राहुल साळवे यांनी लिहिले आहे, तर अण्णा सुरवाडे यांनी गायले आहे. या अल्बमचे संपूर्ण शूटिंग पुणे परिसरात झाले असून, सहनिर्माते सचिन पाटील यांनी निर्मितीसाठी जोरदार मेहनत घेतली आहे.
‘रशके कमर’च्या तुफान यशानंतर उन्मेष तायडे यांचा ‘माय शिवबाची’ हा अलबम सध्या युट्युबवर धुमाकूळ घालत आहे. अप्पा नेवे यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बममध्ये उन्मेष तायडे यांच्या मुख्य भूमिकेने जिवंतपणा आणला आहे, तर अल्बम प्रमोशनसाठी मनोहर तायडे व संजय भैसे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, बर्याच संघर्षानंतर १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ जयंतीदिनी प्रदर्शित होणार्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर खिळवून आहे. तत्पूर्वी अल्बमचा प्रोमो, ट्रेलर व ऑडिओ ऑरेंज म्युझिकच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर उपलब्ध असून, बहारदार असे हे गाणे जिजाऊ जयंती गाजवणार, यात तिळमात्न शंका नाही, असा विश्वासदेखील साळवे यांनी व्यक्त केला आहे.
सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी मासाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी राज्यासह इतर राज्यातील जिजाऊ भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पृष्ठभूमीवर राहुल साळवे यांचा ‘माय शिवबाची’ हा अल्बम येत असल्यामुळे राहुल साळवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.