नाबार्डचा साडेचार हजार कोटींचा जिल्हा पतआराखडा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:23 PM2019-01-02T13:23:46+5:302019-01-02T13:24:25+5:30
बुलडाणा : नाबार्डचे पुणे येथील क्षेत्रीय कार्यालय आणि तंत्र अधिकार्याच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी चार ...
बुलडाणा: नाबार्डचे पुणे येथील क्षेत्रीय कार्यालय आणि तंत्र अधिकार्याच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी चार हजार ५५० कोटी रुपयाचा दिशादर्शक पतआराखडा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात आला असून पीक कर्ज आणि शेती मुदती कर्जासाठी यामधअये ७६ टक्के अर्था त तीन हजार ४५७ कोटी रुपयांची तर उद्योग व्यवसाय आणि शासकीय योजनांचा समावेश असलेल्या इतर कर्जांसाठी यात एक हजार ९३ कोटी ३५ लाख (२४ टक्के) तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पीक कर्ज आणि उत्पादनाचा विचार करता यंदाच्या या पतआराखड्यात ३० टक्के वाढ करून हा पतआराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे आणि जिल्ह्यातील बँकर्सच्या उपस्थितीत हा दिशादर्शक पतआराखडा जिल्हाधिकार्यांच्या दालनात नाबार्डे विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे यांनी मांडल्यानंतर तो जाहिर करण्यात आला. यामध्ये पुढील वित्तीय वर्षासाठी शेती पीक कर्जासाठी दोन हजार ६६१ कोटी ७२ लाख आणि शेती मुदती कर्जासाठी ७९५.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून उद्योग व व्यवसायिक कर्जासाठी ३१८ कोटी २९ लाख आणि शासकीय योजना तता इतर व्यावसायिक कर्जे की ज्यामध्ये मुद्रा लोणचाही समावेश आहे त्यासाठी ७७५ कोटी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षात खरीपाचे पाच लाख ११८ हेक्टरवर पेरणीचे संभाव्य उदिष्ठ असून सोयाबीन दोन लाख ७९ हजार ५८२, कापूस एक लाख १३ हजार ७४१, तूर ५२ हजार ६३७, उडीद, मूग २९ हजार ९१४, ज्वारी-मका २२ हजार ४९६ आणि इतर पिके एक हजार ७४८ हेक्टरवर घेण्यासंदर्भातील संभाव्य नियोजन अनुषंगीक आराखड्यात आहे. शेती मुदतीकर्जासाठीचे नियोजन पुढील वित्तीय वर्षाच्या अनुषंगाने सिंचन व मुलभूत सुविधा कर्जासाठी ३८८ कोटी रुपये, यांत्रिकीकरणासाठी ५३ कोटी ७३ लाख, फळबाग व शेती सुधारणा कर्जासाठी ८८.२६ कोटी, पशुपाल व मत्स्य व्यवसाय मुदती कर्जासाठी ११५ कोटी, धान्य गोदाम, शीतगृह, बीज प्रक्रिया रासायनिक व सेंद्रीय खते तथा शेती विकासासाठी ११३ कोटी, शेत माल प्रक्रया उद्योगासाठी ३६ कोटी रुपयांची या संभाव्यता युक्त ऋण योजनेतंर्गत तरतूद करण्यात आली आहे.