चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद खरेदीत कोटींचा घोटाळा; ‘स्वाभिमानी’ची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:47 PM2018-01-09T23:47:40+5:302018-01-09T23:48:03+5:30
बुलडाणा : चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद विक्री करणार्यांची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकर्यांच्या नावाने व्यापार्यांनी मोठय़ा प्रमाणात चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद विक्री करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. यामध्ये व्यापारी, दलाल व काही राजकीय महाठगांचा सहभाग असून, शेतकर्यांना माहीत नसतानाही त्यांच्या सात-बारावर उडीद विक्री करणार्यांची सखोल चौकशी करून या दोषींना गजाआड करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.
जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या तक्रारीत रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, चिखली येथील नाफेड केंद्रावर व्यापार्यांनी मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार केला. ज्या शेतकर्यांनी बियाणे महामंडळाकडून बी घेऊन पेरणी केली, त्यासंदर्भात अहवाल मंडळ कृषी अधिकार्यांनी बीज प्राधिकरण अधिकार्यांनाही दिला आहे. त्यावर सोयाबीन महामंडळाला दिल्यावरही त्याच सात-बारावर नाफेडला उडीद दिला आहे. वास्तविक शेतकर्यांनी महामंडळाकडून जे सोयाबीनचे बियाने घेतले त्या फाउंडेशन प्लॉटमध्ये आं तरपीक घेता येत नाही. शेतकर्यांनीसुद्धा तसे पीक लावले नाही. अनेक शेतकर्यांनी सोयाबीनचे उत्पन्नदेखील महामंडळालाच दिले त्यापोटी २ हजार ५00 रुपये प्रति िक्वंटलप्रमाणे सोयाबीनची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यावरून सदर शेतकर्यांनी सोयाबीन पेरल्याचे सिद्ध होते; परंतु त्याच सात-बारावर त्याच शे तकर्यांनी उडिदाचे उत्पन्न घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच सात-बारावर व्यापार्यांनी तुरीचेसुद्धा ऑनलाइन बुकींग करून ठेवल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे, तसेच महामंडळाचे बियाणे पेरणार्या सोयाबीन उत्पादकांचे सात-बारे व्यापार्यांनी वापरून त्याच सात-बार्यावर उडिदाची विक्री चिखली नाफेड केंद्रावर केल्याचे स्पष्ट हो ते. बियाने महामंडळाची यादी व नाफेड खरेदी केंद्रावर उडीद विक्री केलेल्या शेतकर्यांची यादी, तुरीसाठी आगावू ऑनलाइन बुकींग केलेली यादी या सर्व याद्यांची तपासणी केली तर झालेला सर्व घोटाळा उघडकीस येऊन व्यापारी, दलाल आणि काही राजकीय पुढार्यांचा खरा चेहरा समोर येईल. यासाठी सदर घोटाळ्याची सक्षम व राजकीय दबावाला बळी न पडणार्या अधिकार्यांकडून सखोल चौकशी दोषी व्यापार्यांची देयके रोखून ठेवा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
आठ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन
येत्या आठ दिवसात दोषी व्यापार्यांवर फौजदारी कारवाई करुन त्यांना कडक शिक्षा करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दिलेल्या तक्रारीत दिला आहे.