बुलडाण्यातील क्रिकेट स्पर्धेत नागपूरच्या संघाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:42+5:302021-02-15T04:30:42+5:30

बुलडाणा येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंसह क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. पांढरकवडा विरुद्ध मनाली ब्रदर्स असा अंतिम सामना झाला. या सोहळ्याकरिता ...

Nagpur team wins Buldana cricket tournament | बुलडाण्यातील क्रिकेट स्पर्धेत नागपूरच्या संघाची बाजी

बुलडाण्यातील क्रिकेट स्पर्धेत नागपूरच्या संघाची बाजी

Next

बुलडाणा येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंसह क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. पांढरकवडा विरुद्ध मनाली ब्रदर्स असा अंतिम सामना झाला. या सोहळ्याकरिता पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नामदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता गायकवड यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीला मनाली ब्रदर्स नागपूर संघाने १२ षटकात १५१ धावा काढल्या. त्यानंतर दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना पांढरकवडा संघाला फलंदाजी करताना १२ षटकात केवळ १४४ धावा काढता आल्या. त्यामुळे सात धावांनी मनाली ब्रदर्स संघ विजयी ठरला. यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये १७२ धावा आणि सात बळी घेणारा मॅन ऑफ दि सिरीज पांढरकवडाचा वसीम शेख याला देण्यात आले. बेस्ट बॉलर आठ बळी घेणारा मनाली ब्रदर्स नागपूरचा फिरोज शेख ठरला. बेस्ट फलंदाज १८९ धावा काढलेला लाईक अन्सारी, बेस्ट कॅचेस स्वप्नील उसरे बुलडाणा, बेस्ट फिल्डर आसीफ खान पांढरकवडा आणि मॅन ऑफ दि मॅच सागर रणपिसे याला देण्यात आले. यावेळी धर्मविर आखाडा आमदार चषक २०२१ चे विजेता संघ मनाली ब्रदर्स नागपूर संघाला पाच लाख रुपये रोख व कप देण्यात आला. उपविजेत्या संघाला दोन लाख रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले. या सामन्यासाठी मुंबई, ठाणे येथील पंच गोट्या उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, युवासेना अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, अनुप श्रीवास्तव, नयन शर्मा, मलय बोरकर, विक्रांत गुळवे, चेतन सोनुने, मोहसीन खान, समालोचक ओम सोनुने यांनी परिश्रम घेतले.

प्रेक्षक गॅलरीवर शेड उपलब्ध करणार : शिंगणे

येथील जिजामाता क्रीडा संकुल मैदानावरील प्रेक्षगार गॅलरीमध्ये प्रेक्षकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रेक्षकांना बसण्यासाठी सावली रहावी याकरिता तात्काळ पक्के शेड उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन राजेंद्र शिंगणे यांनी केले. त्या विषयीची मागणी सामन्यादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी केली होती.

Web Title: Nagpur team wins Buldana cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.