पल्स ऑक्सिमीटर नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:05+5:302021-05-21T04:36:05+5:30

११८ ठिकाणी रस्त्यांचा अभाव चिखली: तालुक्यातील १४३पैकी ११८ गावातील स्मशानभूमींना पोचरस्ते नाहीत. अनेक गावात पाऊलवाटेने अथवा काट्या-कुट्याच्या ओबडधोबड रस्त्यांवरून ...

Named pulse oximeter | पल्स ऑक्सिमीटर नावालाच

पल्स ऑक्सिमीटर नावालाच

Next

११८ ठिकाणी रस्त्यांचा अभाव

चिखली: तालुक्यातील १४३पैकी ११८ गावातील स्मशानभूमींना पोचरस्ते नाहीत. अनेक गावात पाऊलवाटेने अथवा काट्या-कुट्याच्या ओबडधोबड रस्त्यांवरून मृतदेह स्मशानभूमीकडे न्यावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते.

बियाणे अनुदान वाढविण्याची मागणी

बुलडाणा : शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देऊनही भाववाढीमुळे बियाणे खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सेवा प्रभावित

मेहकर : तांत्रिक कारण दाखवून ग्रामपंचायतीमध्ये अनेक दिवस ऑनलाईन सेवा ठप्प राहात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दाखले मिळत नसल्याने ऑनलाईन सेवा ठप्प का? याबाबत चौकशी करुन कारवाई होणे गरजेचे आहे.

फूल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

किनगाव राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. यावर्षी कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागल्याने आगामी काळात फुलांची शेती कमी होण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात तालुक्यामध्ये फुलशेतीचे प्रमाण वाढले होते.

Web Title: Named pulse oximeter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.