ग्रामपंचायत प्रशासकांची नावे पालकमंत्र्यांकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:04 AM2020-08-31T11:04:17+5:302020-08-31T11:04:25+5:30

यादी अंतिम करण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे असल्याची माहिती आहे.

Names of Gram Panchayat Administrators to Guardian Minister! | ग्रामपंचायत प्रशासकांची नावे पालकमंत्र्यांकडे !

ग्रामपंचायत प्रशासकांची नावे पालकमंत्र्यांकडे !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ येत्या ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत असल्याने त्याठिकाणी प्रशासनातील विस्तार अधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची यादी अंतिम करण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही यादी उद्या सोमवारी बाहेर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लगतच्या अकोला, वाशिम जिल्ह्यात प्रशासकांची नियुक्ती आधीच झाली असताना बुलडाणा जिल्ह्यात ऐनवेळेपर्यंतही यादी अंतिम होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाºयांची नियुक्ती केली जात आहे. त्यासाठी अधिकाºयांची यादी तयार आहे. तसे प्रस्ताव सर्वच पंचायत समित्यांची गटविकास अधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागात असलेल्या विस्तार अधिकाºयांसह ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम या विभागाचे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिकांची यादी तयार आहे. ग्रामपंचायत निहाय नियुक्तीचा आदेश त्यांना दिला जाणार आहे. त्या यादीबाबत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांची सहमती होण्याला विलंब होत आहे. त्यामुळेच ३१ आॅगस्ट उजाडत असला तरीही प्रशासकांची नियुक्ती न होण्याचा प्रकार घडत आहे.
राज्यातील १२६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपत आहे. त्यापैकी हजारो ग्रामपंचायतींची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी या तारखेपर्यंत प्रशासक नियुक्त करणे महाराष्ट्र ग्रामपंचयात अधिनियमानुसार क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा ग्रामविकास विभागाने दिला. मात्र, अधिनियमातील तरतुदीऐवजी प्रतिष्ठित नागरिकाची या पदावर नियुक्ती पालकमंत्र्यांनी करावी, असा बदल केला.
त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला. शासनाच्या त्याच आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
त्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे विस्तार अधिकाºयांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची वेळ राज्य शासनावर आली. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नको, यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केले. त्यामध्ये विस्तार अधिकाºयांच्या समकक्ष अधिकाºयांची नावे आहेत. ती यादी अंतिम होण्याला ग्रामपंचायतींच्या मुदतीचा शेवटचा दिवस उजाडत आहे.
विशेष म्हणजे, प्रशासक पदाच्या नियुक्तीबाबत राज्य शासनाने यापूर्वी दिलेल्या आदेशाविरूद्ध दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ पैकी २२८ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर १० सप्टेंबर तसेच ३० सप्टेंबर रोजी २८९ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. त्यावरही प्रशासक नियुक्त होणार आहेत.


सरपंच पायउतार, प्रशासकाची नियुक्ती
उद्या मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्यांनी कोणत्याही कारणाने प्रभार न घेतल्यास तो नंतरही घेता येईल. मात्र, सरपंच पद त्याच दिवशी रिक्त झाल्याचे समजण्यात येईल. एखाद्या ठिकाणी वाद उद्भवल्यास तेथे प्रशासकाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


प्रशासकाला आदेश दिल्यानंतर तेच त्या पदावर नियुक्त असल्याचे समजले जाते. काही कारणास्तव प्रभार घेण्याबाबत मागे-पुढे होऊ शकते. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही.
- राजेश लोखंडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

 

Web Title: Names of Gram Panchayat Administrators to Guardian Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.