लोकसहभागातून तयार केला नाना-नानी पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:54+5:302021-06-20T04:23:54+5:30
देऊळगावराजा : वृक्षलागवड व संगोपन ही काळाची गरज आहे. कोरोना कालावधीत अनेकांना ऑक्सिजनचे महत्त्व पटले. मात्र त्यातूनही अनेकजणांनी याला ...
देऊळगावराजा : वृक्षलागवड व संगोपन ही काळाची गरज आहे. कोरोना कालावधीत अनेकांना ऑक्सिजनचे महत्त्व पटले. मात्र त्यातूनही अनेकजणांनी याला प्राधान्य दिले नसल्याचे चित्र दिसत आहे़ केवळ वृक्षलागवडच नव्हे तर त्या वृक्षांचे संगोपन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही़ शहरातील आदर्श कॉलनीमधील नगर परिषदेच्या ओपन स्पेसमध्ये लाेकसहभागातून नाना-नानी पार्क तयार केला आहे़
नगरपालिका प्रशासनाने या ओपन स्पेसला तारांचे कुंपण करून दिले हाेते़ त्यामध्ये या परिसरातील नागरिकांनी हरितपट्टा निर्माण करण्याचा निर्णय घेतला़ परिसरातील लाेकांनी काही दिवसांत हजाराे रुपये जमा केले़ तेथे आदर्श नाना-नानी पार्क तयार करण्यात आला़ वेगवेगळ्या जातीची शोभिवंत झाडे या पार्कमध्ये लावून त्याचे संगोपनासाठी ठिबकद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली़ वृक्षलागवडच्या मुख्य कार्यक्रमात मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, माजी नगरसेवक शौकत हुसेन, प्रदीप वाघ यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले़ यावेळी नगर परिषदेच्या वतीने वेळोवेळी जे काही सहकार्य लागेल, ते देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी यावेळी उपस्थितांना दिले़