नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

By Admin | Published: March 9, 2017 01:37 AM2017-03-09T01:37:46+5:302017-03-09T01:37:46+5:30

भारतीय खाद्य निगमची अनागोंदी; सव्वीस दिवसांपासून तीस हजार क्विंटल तूर उघड्यावर.

At Nandura thirty thousand quintals fall! | नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

googlenewsNext

सुहास वाघमारे
नांदुरा, दि. ८- पीक पिकविण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शेतकर्‍याला ते हमी भावाने विकण्यासाठीही महिनाभराचा संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दिसून येत आहे. येथे भारतीय खाद्य निगमची तूर खरेदी बारदाना नसल्याचे कारण सांगून बंद पडल्याने मागील सव्वीस दिवसांपासून तीस हजार िक्वंटल तूर आवारात उघड्यावर पडून आहे. तर रात्रंदिवस शेतकरी त्या तुरीच्या गंजीवरच जेवण व झोपून संरक्षण करीत आहेत.
तुरीला हमीभावापेक्षा अत्यल्प भाव बाजारपेठेत मिळत असल्याने भारतीय खाद्य निगमने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तुरीची हमीभावाने खरेदी सुरु केली आहे; मात्र सुरुवा तीला दोन ते तीन दिवसच हमिभावाची खरेदी सुस्थितीत होती; मात्र त्यानंतर शेतकर्‍यांच्या नावावर व्यापार्‍यांचा माल विकला जात असल्याची ओरड झाली व त्यातच बारदाना सं पल्याचे सांगून सदर तूर खरेदी खंडित झाली आहे. त्यामुळे मागील १0 फेब्रुवारीपासून शेतकर्‍यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली तूर पडून आहे. आज रोजी सुमारे सव्वीस दिवसात तीस हजार क्विंटल तुरीचा साठा बाजार समिती आवारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला आहे. मागील महिनाभरात जेमतेम पाच ते सात दिवस भारतीय खाद्य निगमचे हे केंद्र सुरळीत सुरु होते व ते फक्त पाचशे ते सातशे क्विंटल माल खरेदी करतात व लगेच बारदाना संपला सांगून बाजार समितीमधून निघून जातात. मागील सव्वीस दिवसांपासून शे तकर्‍यांनी तुरीचा माल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणल्याने शेतकरी त्या मालाच्या सुरक्षिततेसाठी बाजार समिती परिसरातच असतात. रात्रीच्यावेळी त्यांच्या तुरीच्या मालावर जेवण करताना व झोपलेले शेतकरी हे नित्याचेच चित्र आता बाजार समितीमध्ये आहे. ७ मार्चच्या दुपारी ढगाळ वातावरण व पावसाबाबत हवामानाचा अंदाज काहींनी व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी त्यांचा तुरीच्या मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी धावाधाव केली.

.. अन सभापतींनी झाकली तूर
ढगाळ वातावरणामुळे ७ च्या संध्याकाळी बाजार समितीत शेतकरी पावसापासून संरक्षणासाठी तुरीच्या मालाला प्लास्टिकच्या कापडाने झाकत होते. त्याचवेळी सभापती नीळकंठराव भगत त्यांच्या शेतातील तुरीचा माल झाकत होते. यावेळी त्यांची स्वत:ची तूर त्यांनी १0 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी आणली असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच भारतीय खाद्य निगम खरेदीबाबत गंभीर नसल्याने शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव असल्याचे सांगून याबाबत आमदार चैनसुख संचेती प्रयत्नरत असल्याने बारदाना उपलब्ध होणार आहे.

Web Title: At Nandura thirty thousand quintals fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.