नांदुरा : जप्त केलेला ट्रॅक्टर तहसीलमधून लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:09 AM2018-01-16T00:09:36+5:302018-01-16T00:11:50+5:30
नांदुरा : अवैध रेती वाहतुकीत जप्त केलेले ट्रॅक्टरच तहसील आवारातून चोरुन नेण्याची घटना १२ जानेवारीच्या रात्री ११ वाजे दरम्यान उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : अवैध रेती वाहतुकीत जप्त केलेले ट्रॅक्टरच तहसील आवारातून चोरुन नेण्याची घटना १२ जानेवारीच्या रात्री ११ वाजे दरम्यान उघडकीस आली.
याप्रकरणी अनिल अशोक गिरी, मंडळ अधिकारी वडनेर भोलजी यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. अवैध रेतीची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८ डी २९६0 ला जप्त करून पुढील कार्यवाहीकरिता नांदुरा तहसील कार्यालयात आणण्यात आले होते; मात्र वडनेर भोलजी येथील शेख आरीफ शेख रज्जाक, आसीफ खान सलाम खान या दोघांनी संगनमत करून रात्री ११ वाजे दरम्यान ट्रॅक्टर किंमत अंदाजे २ लाख व १ ब्रास रेती किंमत ३ हजार रुपये एकूण २ लाख ३ हजार रुपयांचा माल चोरुन नेला, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३७९, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस अधिकारी रामेश्वर कांडोरे करीत आहेत. तालुक्यात गौण खनिज चोरीच्या घटना वाढल्या असून, जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात जमा केली आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना किंवा पोलीस तपासात असताना वाहन घेऊन जाणे हा गुन्हा मानला जातो.