आपट्याच्या झांडांना पानगळ

By admin | Published: November 1, 2016 03:27 PM2016-11-01T15:27:38+5:302016-11-01T15:27:38+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे.

Naphthalitis | आपट्याच्या झांडांना पानगळ

आपट्याच्या झांडांना पानगळ

Next
>ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात विविध प्रजातीचे वृक्ष असून त्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांच्या पानांना गळती लागल्याने अभयारण्यातील आपट्याच्या झाडांचे केवळ सांगाडे पाहायला मिळत आहेत. 
 
वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व  वाढत्या प्रदुषणाला नियंत्रणात ठेवण्यात वनांचा मोलाचा वाटा आहे.  निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत  वनविभागामार्फत प्रयत्न करण्यात येतात. भोगौलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.  त्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे मात्र आहेत ते वृक्ष संवर्धनाअभावी वाळून जात आहेत. बुलडाणा  जिल्ह्याला वन विभागाचा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले असून या अभयारण्यात अनेक प्रजातीचे वृक्ष आहेत. त्यामध्ये बहुआयामी समजल्या जाणाºया आपट्यांची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. हिरवागार शालू पांघरून घेतलेल्या या आपट्यांच्या झाडाने ज्ञानगंगा अभयारण्याला शोभा येते. मात्र, ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांची पाने झडत असल्याने सर्व हिरव्यागार झाडांमध्ये ही झाडे वेगळी दिसत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक आपट्याच्या झाडे वाळल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
 
 
शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात
 
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्याबरोबरच १२७.११० चौ.कि़मी.क्षेत्रावर अंबाबरवा अभयारण्य व ३.८३१ चौ.कि़मी. क्षेत्रावर लोणार अभयारण्य आहे. हे तीनही अभयारण्य वनसंपदेने वैभवशाली आहेत. या वनांमध्ये विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फलांचाही समावेश आहे. शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू आहेत. परंतू गेल्या काही वर्षापासून अभयारण्यामधील शोभेची झाडे व औषधी वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांचे योग्य संवर्धन होत नसल्याने शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात आली आहे. 

Web Title: Naphthalitis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.