पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जन्मठेप! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:16 AM2017-12-06T01:16:36+5:302017-12-06T01:17:38+5:30

खामगाव: स्वत:च्या  पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जिल्हा  व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

Naradham Bapu's life imprisonment for abusing two-year-old daughter! | पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जन्मठेप! 

पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जन्मठेप! 

googlenewsNext
ठळक मुद्देआईच्या निधनानंतर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्वत:च्या  पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जिल्हा  व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये  स्वत:च्या मुलीवर सतत दोन वर्षांपासून शारीरिक व लैंगिक  अत्याचार तसेच ९ मे २0१४ रोजी जबरी बलात्कार केल्याची फिर्याद प्राप्त झाली. त्यानुसार प्रा थमिक रिपोर्ट घेत सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला व कलम ३७६ (२), (फ),  (न) कलम ३, ४ पोस्को २0१२ प्रमाणे 0६  ऑगस्ट  २0१४  रोजी दोषारोपपत्र दाखल करण्या त आले. 
तसेच सदर प्रकरणात सत्र क्रमांक ६५/१४  नोंदवून न्यायालयात कलम ३७६ (२), (फ),  (न) कलम ३, ४ पोस्को २0१२ कलम ३७६ (२), (फ), (न) कलम ५0६ भादंवि ६, २0   पोस्को २0१२ नुसार दोषारोप ठेवण्यात आला. त्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार त पासण्यात आले. 
यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादीच्या भावाची साक्ष महत्त्वाची ठरली.  अंतिम  सुनावणीनंतर आरोपीने स्वत:च्या  अल्पवयीन  मुलीवर वेळोवेळी तिला मारण्याची धमकी देऊन,  चाकू  दाखवून  वारंवार बलात्कार केल्याचे तसेच लैंगिग अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्याने  आरोपीस कलम  कलम  ३७६ (२), (फ), (न) कलम ६,१0 पोस्को  २0१२  नुसार दोषी  ठरविण्यात आले असून, आरोपीस ३७६(२), (फ), (न), भादंविप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व  ५00 रुपये  दंड कलम  ६  नुसारदेखील  जन्मठेपेची शिक्षा व ५00 रुपये दंड, ५0६ भादंवि प्रमाणे जीवे मारण्याची  धमकी दिल्याचे सिद्ध झाल्याने २ वर्षांची शिक्षा व २00 रुपयांचा दंड  ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे  सदर प्रकरणात १0 प्रमाणे  बालकांचे लैंगिक अत्याचारापासून  संरक्षण अन्वयेसुद्धा दोषी ठरविण्यात आले; मात्र जन्मठेपेची मोठी शिक्षा सुनावल्यामुळे  त्यात  वेगळी शिक्षा सुनावण्यात आली नाही. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीय व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या  न्यायालयाने दिला. सरकार पक्षाच्यावतीने अँड. रजनी बावस्कर यांनी काम पाहिले.या प्रकरणा तील पीडितेच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. दुसर्‍या पत्नीने आत्महत्या  केल्यानंतर पीडितेचा लैंगिक छळ करण्यात आला.
 

Web Title: Naradham Bapu's life imprisonment for abusing two-year-old daughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.