देउळगाव घुबे शिवारातून स्प्रिंकलरचे नाेझल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:58+5:302021-09-15T04:39:58+5:30
साेयाबीनवर राेगराईचे आक्रमण, शेतकरी त्रस्त माेताळा : गत काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे साेयाबीनवर राेगराईने आक्रमण केले ...
साेयाबीनवर राेगराईचे आक्रमण, शेतकरी त्रस्त
माेताळा : गत काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे साेयाबीनवर राेगराईने आक्रमण केले आहे. त्यामुळे, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
बुलडाणा शहरात प्लास्टिकबंदी नावालाच
बुलडाणा : शहरात गत काही दिवसांपासून प्लास्टिकबंदी नावालाच असल्याचे चित्र आहे. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते सर्रास फळांची प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. त्यामुळे, प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.
शेलगाव बाजार येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
तळणी : शेलगाव बाजार येथे शेतकऱ्यांना ई पीक पेऱ्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य महेंद्र गवई, पं. स. सदस्या उज्ज्वला पाटील आदी उपस्थित हाेते. या वेळी तहसीलदार साेनवणे यांनी इ पीक पेऱ्याविषयी मार्गदर्शन केले.