नाटेकर यांना जिवे मारण्याची धमकी

By admin | Published: August 28, 2015 12:20 AM2015-08-28T00:20:05+5:302015-08-28T00:20:05+5:30

साठे महामंडळातील भ्रष्टाचारप्रकरणी जिवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल.

Natekar threatens to kill them | नाटेकर यांना जिवे मारण्याची धमकी

नाटेकर यांना जिवे मारण्याची धमकी

Next

बुलडाणा : अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर हे महामंडळ चर्चेत असतानाच यातील भ्रष्टाचार उकरून काढण्यासाठी दीड वर्षांपासून सतत तक्रारी करणारे बुलडाणा ये थील वकील गुणवंत नाटेकर यांना एका दलालाने भ्रमणध्वनीवरून खून करण्याची धमकी दिली. २६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व दलालांकडून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. यासंदर्भात अँड. गुणवंत नाटेकर यांनी ७ एप्रिल २0१४ रोजी संबंधितांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्या हाती काही बोगस लाभार्थ्यांचे बँकेचे खातेउतारे लागले. काही पुरावे सापडल्यानंतर अँड. नाटेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खाते, जिल्हाधिकारी, मंत्रालय व सीआयडीकडे सर्व पुराव्यानिशी रीतसर तक्रारीही केल्या. आजपर्यंंत १५ ते १६ तक्रारी झाल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या समाजबांधवांसोबत १५ दिवसांचे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक साखळी उ पोषणदेखील केले होते. विशेष म्हणजे, दलालांवर कारवाई करण्यासाठी २0 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे सत्याग्रह आंदोलनसुद्धा करण्यात आले होते. तक्रारी व आंदोलनांमुळे भ्रष्टाचारात गुंतलेले दलाल हैराण झाले. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी रात्री पाणवेनऊ वाजता अँड. गुणवंत नाटेकर आपल्या मूळगावी रायपूर येथे अस ताना, भारत एकनाथ गायकवाड (रा. घाटनांद्रा) या दलालाने त्याच्या मोबाइलवरून त्यांना धमक्या दिल्या. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या तक्रारी देणे बंद कर, नाही तर तुझा खून करू, अशा धमक्या देऊन शिवीगाळ केल्याची तक्रार अँड. नाटेकर यांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरो पीविरुद्ध भादंवि कलम ५0४, ५0६, ५0७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Natekar threatens to kill them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.