अंजनी खुर्द येथे राष्ट्रीय पोषण पंधरवाडा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:48+5:302021-03-26T04:34:48+5:30
राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत साजरा केला जातो. यामध्ये बालकांचे तसेच गरोदर, स्तनदा ...
राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत साजरा केला जातो. यामध्ये बालकांचे तसेच गरोदर, स्तनदा मातांचे आरोग्य अबाधित, निरोगी राहावे या दृष्टीने त्यांना दैनंदिन आहारात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे हे हे विविध पालेभाज्या, फळे, डाळी यांचे सेवन करून मिळत असते. या संदर्भात एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत मार्गदर्शन केले जाते.
अंजनी खुर्द येथील अंगणवाडी केंद्रात हा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. या वेळी पोषण आहाराची सुबक रांगोळी काढून सजावट करण्यात आली. तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना पालेभाज्या, फळांचे कीट व शेवग्याच्या रोपट्यांचे वाटप एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे करून हा पंधरवडा साजरा केला. यावेळी सरपंच शीला अशोक खराटे, उपसरपंच विजय अवसरमोल तसेच अंगणवाडी सेविका शोभा भोकरे, छाया गायकवाड, कुसुम मिसाळ, मीरा गौंड, शारदा जाधव, मदतनीस कमल मिसाळ, साधना गायकवाड, पवन साठे उपस्थित होत्या.