शेगाव तालुक्यात राष्ट्रीय पीकविमा योजना लागू
By admin | Published: July 22, 2014 11:51 PM2014-07-22T23:51:08+5:302014-07-23T00:08:18+5:30
२0१४-१५ या वर्षाकरिता राष्ट्रीय पिक विमा योजना लागू करण्यात आली असून यामध्ये ७ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
सेलू : शहराचा वाढता विस्तार, स्वच्छता कामगारांची अपुरी संख्या त्यातच पावसाळ्याचे दिवस असताना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप सुरू केल्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
दरम्यान, नगरपालिकेने स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगाराची नियुक्ती केली आहे़ राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी १७ जुलैपासून बेमुदत संप चालू केला आहे़ त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले असून सफ ाई कामगारही संपावर असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे़ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर शंभर टक्के अनुदान शासनाने द्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित रक्कम व सेवानिवृत्त रक्कम शासनानी द्यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, सफाई विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने मोफत घरे बांधून द्यावीत, अनुकंपा धर्तीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी़, १२ ते २४ वर्षाची पदोन्नती देण्यात यावी, संवर्गातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यात यावी, मुख्याधिकारी पदावर पन्नास टक्के कर्मचाऱ्यांतून नियुक्ती करण्यात यावी या मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे़ दरम्यान, ऩ प़ कर्मचाऱ्यांनी २१ जुलै रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले़ यावर कॉ़ रामकृष्ण शेरे, कॉ़ सय्यद इब्राहीम बाबूभाई, म़ अय्युब अमीनोद्दीन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
पालिकेने लावले २० कंत्राटी कामगार
नगरपालिका कर्मचाऱ्यांसह सफ ाई विभागातील सर्व कामगार संपावर गेल्यामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे़ पावसाळयाचे दिवस असल्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत़ अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे़ १७ जुलैपासून हा संप सुरू झाल्यामुळे सर्वत्र कचरा साचला आहे़ सफाई कामगार संपावर गेल्यामुळे नगरपालिकेने वीस कंत्राटी कामगार स्वच्छतेसाठी लावले आहेत़ आवश्यक त्या भागात स्वच्छता करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष सुरेश कोरडे यांनी दिली़