लोणार सरोवर संवर्धनाच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान महोत्सव
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 4, 2023 06:38 PM2023-03-04T18:38:00+5:302023-03-04T18:38:33+5:30
बुलढाण्यासह इतर जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश
लोणार : स्थानिक बनमेरू विज्ञान महाविद्यालयात ३ व ४ मार्च रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन व 'लोणार सरोवराचे संवर्धन' या उद्देशाने सहावे राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सव पार पडला. या महोत्सवात बुलढाण्यासह इतर जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश होता.
महोत्सवाचे आयोजन विमुक्त फाउंडेशन पुणे, कै. कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणार, पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठ रायपूर, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला व देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. महोत्सवाची सुरुवात ३ मार्च रोजी विज्ञान ज्योत रॅलीने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सैफन नदाफ, प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागर समितीचे प्रमुख महेश पाटील, दीपक साळवे, डॉ. सूर्यकांत बोरुळ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. लोणार विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बनमेरू हे होते. उद्घाटक म्हणून एम. ई. एस महाविद्यालय मेहकरचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक प्रा. सौरभ गायकवाड यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महेंद्र भिसे यांनी केले. आभार डॉ. मिलिंद गायकवाड यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनात ६३ विद्यार्थ्यांचा सहभाग
महोत्सवात विज्ञान प्रदर्शनही पार पडले. यावेळी विविध महाविद्यायातील एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अखेरच्या सत्रात या विज्ञान प्रदर्शनीचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विज्ञान प्रदर्शनीचे पहिले बक्षीस बुरुंगले महाविद्यालय शेगाव येथील विद्यार्थी विजय डिगोळे आणि गौरव आढाव, दुसरे बक्षीस आदर्श महाविद्यालय हिंगोली येथील ऋषिकेश हरकाळ, जिवन इंगोले, तृतीय बक्षीस शिवाजी महाविद्यालय अकोला येथील पलक म्होता, धनश्री देशमुख, उत्तेजनार्थ बक्षीस पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथील मो. साहेर याला, देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज देशपांडे व शुभम कळसकर यांना मिळाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"