जिजामाता महाविद्यालयात इंग्रजी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:12+5:302021-07-26T04:31:12+5:30
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे आयोजित या वेबिनारचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे राहणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी ...
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे आयोजित या वेबिनारचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे राहणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. सुमथी माया, डॉ. संजय प्रसाद शर्मा हे इंग्रजी साहित्य क्षेत्रातील नामवंत वक्ते उपस्थित राहणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे वेबिनारकरिता देशातील सर्व राज्यांमधून तसेच केनिया, दुबई, फिलिपीन्स, ओमन, पाकिस्तान अशा विविध देशांतूनसुद्धा पाचशेहून अधिक शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, लेखक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली असून, या वेबिनारला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख डॉ. वंदना काकडे यांनी दिली आहे.
चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन
इंग्रजी साहित्यावर २७ जुलै २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजेपासून ऑनलाइन चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी सर्व शिक्षण व साहित्यप्रेमींनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, वेबिनारचे संयोजक डॉ. भरत जाधव तथा अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे समन्वयक प्रा. सुबोध चिंचोले यांनी केले आहे.