जिजामाता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:54+5:302021-09-09T04:41:54+5:30
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे तर उद्घाटन म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे उपस्थित होते. ...
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे तर उद्घाटन म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे उपस्थित होते. उद्घाटन पर भाषणात डॉ.रामेश्वर भिसे यांनी कोरोना हा भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली कीड असून, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला असल्याचे प्रतिपादन केले.
वेबिनारच्या प्रथम सत्राचे मार्गदर्शक शासकीय महाविद्यालयात घट्टिया (मध्य प्रदेश) येथील अर्थशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ.शेखर मैदामवर यांनी कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्यामुळे बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, त्यामुळे आर्थिक विकासाच्या दारात मोठी घसरण झाल्याचे सांगितले. वेबिनारच्या दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक विदर्भ शासकीय महाविद्यालय अमरावती येथील पदवीत्तर अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.विनोद गावंडे यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना संकट हे भयानक असून, भारतीय अर्थव्यवस्थेचे नियोजन हे चीन आणि इतर देशांप्रमाणे न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाल्याचे डॉ.प्रशांत कोठे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ.विकास पहुरकर, संचालन डॉ.रेश्मा सोनवलकर तर आभार समन्वयक डॉ.डी.जे. कांदे यांनी केले. या चर्चासत्रासाठी ५०० पेक्षा जास्त प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक व लेखक ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी चर्चासत्राचे समन्व्यक डॉ.ई.जे. हेलगे, प्रा.सुबोध चिंचोले, डॉ.भरत जाधव, डॉ.योगेश रोडे, डॉ.वंदना काकडे यांनी परिश्रम घेतले.