जिजामाता महाविद्यालयात राष्टीय वेबिनार संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:33+5:302021-08-22T04:37:33+5:30

या वेबिनारचे उद्घाटन राजकीय विश्लेषक प्रा. डाॅ. शैलेंद्र देवलनकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहरलाल ...

National webinar held at Jijamata College | जिजामाता महाविद्यालयात राष्टीय वेबिनार संपन्न

जिजामाता महाविद्यालयात राष्टीय वेबिनार संपन्न

Next

या वेबिनारचे उद्घाटन राजकीय विश्लेषक प्रा. डाॅ. शैलेंद्र देवलनकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ नवी दिल्ली येथील राज्यशास्त्र अभ्यास केंद्राचे प्रा. डाॅ. व्ही. बिजुकुमार तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डाॅ. शुजाेद्दीन शाकीर हे उपस्थित हाेते. वेबिनारच्या अध्यक्षपदी प्रा. डाॅ. इ.जे. हेगले हे हाेते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डाॅ. श्रीराम येरणकर यांनी केलेण

राज्यपालांनी स्वविवेकाने काम करावे

वेबिनारमध्ये भारतीय संघराज्यात राज्यपालांची भूमिका या चर्चीत विषयावर मार्गदर्शन करताना राज्यपालांनी केंद्र सरकारचे हस्तक म्हणून कार्य करु नये, असे मत डाॅ. शुजाेद्दीन शाकीर यांनी व्यक्त केले. त्यांनी पंतप्रधान नेहरुंपासून ते आजपर्यंतच्या पंतप्रधानांनी राज्यपाल पदाचे राजकीयीकरण कसे केले याविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: National webinar held at Jijamata College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.