शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:09+5:302021-05-29T04:26:09+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

Nationalist Students Congress is aggressive about tuition fees | शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

Next

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात कपात करावी, विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये, अन्यथा संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी दिला आहे. शिक्षण शुल्क समितीने राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निश्चितीची पुन्हा प्रक्रिया करून नवीन शुल्क निश्चित करावे, तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही, असा आदेश काढावा, केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत, नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य (पुस्तके,वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करू नये. बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहे, तीच पुस्तके शिकवताना वापरावी, दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महागडी पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सहभागी व्हा : आकाश जाधव

ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले, असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये, त्याला शाळा महाविद्यालये सोडण्यास भाग पाडू नये, या मोहिमेत समाजातील सर्वच वर्गाने (विद्यार्थी, पालक, नागरिक, सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा) यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केले आहे.

Web Title: Nationalist Students Congress is aggressive about tuition fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.