निसर्गोपचारात प्रत्येक दुर्धर आजार बरा करण्याची शक्ती! - स्वागत तोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:39 PM2019-05-12T18:39:33+5:302019-05-12T18:39:41+5:30
निसर्ग कुणाचंही वाईट करीत नाही, फक्त मनुष्याला निसर्गाप्रमाणे बदलता आलं पाहीजे. प्रसिध्द निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्याशी साधलेला संवाद.
- अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: निसर्गात मनुष्याला नवसंजीवनी देण्याचं सामर्थ्य आहे. मात्र, धकाधकीच्या जीवनातीत ताण-तणाव आणि मरणाच्या भीतीपायी मनुष्य औषधांच्या आहारी गेला आहे. सोबतच रासायनिक खाद्यान्नामुळे आजाराची संख्या झपाट्याने वाढत असली तरी चिंता करण्याचे काहीही एक कारण नाही. कोणताही दुर्धर आजार निसर्गोपचाराने बरा करता होतो, निसर्गामुळेच मनुष्याचे जीवन च्रक सुरू आहे. निसर्ग कुणाचंही वाईट करीत नाही, फक्त मनुष्याला निसर्गाप्रमाणे बदलता आलं पाहीजे. प्रसिध्द निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्याशी साधलेला संवाद.
निसर्गोपचाराने कोणते आजार बरे होवू शकतात?
ताप, सर्दी, खोकला यासारख्या सामान्य आजारासोबतच संधीवात, बीपी, कॅन्सर, मनोविकार, हॉर्ट अॅटक आणि मधूमेह दूर करण्याचे सामर्थ्य निसर्गात आहे. प्राचीनकाळी ऋषीमुनींनी दुर्धर शस्त्रक्रीयाही निसर्गोपचाराने केल्या आहेत. परंतु, अंधानुकरणाने मनुष्य पाश्चात्य औषधांच्या आहारी गेला आहे.
समाजात आजारांची संख्या वाढण्याचे नेमके कारण काय?
बदलती जीवन शैली आणि धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव हेच मानवी समाजात विविध आजार वाढण्याचे प्रमुख कारणे आहेत. मात्र, मानवाचा कितीही दुर्धर आणि जुनाट आजार बरा करण्याचे सामर्थ्य नैसर्गिक वनस्पतीत आहे. पशू-पशी निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे ते निरोगी आहेत. याउलट मनुष्य विविध औषधांवर अवलंबून आहे. औषधांच्या अतिरेकांमुळेच विविध आजाराच्या संख्येत भर पडतेय.
निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहीजे?
कोणत्याही वनस्पतीकडे लाकूड म्हणून नव्हे तर, संजीवनी म्हणून बघा. जेवणात हलक्या आहाराचा समावेश करा. शक्यतोवर नैसर्गिक आहारच घ्या.
आहार,विहार आणि विचारांमुळे मानवाला अनेक दुर्धर आजार जडले आहेत. मनशुध्द आणि सकारात्मक असेल तर कोणताही आजार मनुष्याच्या शरीरावर आघात करू शकत नाही. याउलट मन अस्थीर आणि अशुध्द असेल तर कोणत्याही औषधांचा कोणताही परिणाम शरीरावर जाणवणार नाही.
निसर्गोपचाराबाबत विदेशात कोठे आपली व्याखान झालीत ?
भारतीय नागरिकांना निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी आपण चळवळ उभी केली आहे. भारतातील विविध ठिकाणी आजपर्यंत तब्बल ८५०० हजारांपेक्षा जास्त व्याखानं दिलीत. या व्याख्यानाचा अनेकांना लाभ झाला. मात्र, विदेशात आपण एकदाही व्याख्यानाच्या निमित्ताने भेट दिली नाही. मात्र, अमेरीका, युरोप, कॅनाडा, श्रीलंका आणि थायलंड सारख्या १२ देशातील अनिवासी भारतीयांसाठी आपण नि:शुल्क सेवा देत आहे. भारतात निरोगी समाजाची निर्मिती हेच आपले अंतिम ध्येय आहे.