#खामगाव कृषी महोत्सवात नैसर्गिक रंगांची उधळण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:55 AM2018-02-20T01:55:35+5:302018-02-20T01:57:02+5:30
खामगाव: रासायनिक रंगांचे दुष्परिणाम समोर आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक रंगांना महत्त्व प्राप्त होत असून, खामगाव येथील कृषी महो त्सवातही नैसर्गिक रंगांची रेलचेल वाढली आहे. रासायनिक रंगांमुळे डोळे आणि त्वचेला अपाय होत असल्याने, होळीला नैसर्गिक रंग वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. शासकीय स्तरावरूनही गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रासायनिक रंगांचे दुष्परिणाम समोर आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक रंगांना महत्त्व प्राप्त होत असून, खामगाव येथील कृषी महो त्सवातही नैसर्गिक रंगांची रेलचेल वाढली आहे. रासायनिक रंगांमुळे डोळे आणि त्वचेला अपाय होत असल्याने, होळीला नैसर्गिक रंग वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. शासकीय स्तरावरूनही गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे. परिणामी, नैसर्गिक रंगांचे महत्त्त्व वाढत असून, या रंगांची मागणी लक्षात घेता, खामगाव येथील कृषी महोत्सवात नैसर्गिक रंगांची चांगलीच विक्री होत आहे. कृषी महोत्सवात आकर्षक नैसर्गिक रंग ३0 ते ५0 रु पयांना ५0 ग्रॅम या दराने विकल्या जात आहे. एक किलो सुका नैसर्गिक हिरवा रंग तयार करण्यासाठी १0 किलो पालकची पाने लागतात, तर केशरी रंग पळसाच्या पानापासून तयार केल्या जातो. त्याशिवाय बीट, काळे द्राक्ष आणि जांभूळ यासार ख्या नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगाला कृषी महोत्सवात चांगलीच मागणी आहे.