हिमाचल प्रदेशात अडकलेले नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:17 AM2020-05-07T11:17:12+5:302020-05-07T11:17:18+5:30
इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते.
बुलडाणा : शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी मायग्रेशन योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेलेले होते. लाॅक डाऊन नंतर हे सर्व विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा प्रशासन व सर्वांच्या प्रयत्ना मुळे हे विद्यार्थी साथ मे रोजी सकाळी शेगाव मध्ये दाखल झाले आहेत.
शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 25 मार्च 2020 रोजी संपले होते. मात्र लाॅक डाऊन 'मुळे वाहतूक व्यवस्था नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांना घरी कसे आणायचे असा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर होता. आठ दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने एक खास आदेश काढून अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करून सदर विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्या चा निर्णय घेतला होता. त्यानंतर
चंबा येथून हे विद्यार्थी हिमाचल प्रदेश मधून राजस्थान पर्यंत एका खासगी बस द्वारे आणण्यात आले. तर शेगाव येथून जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची एक शिवशाही बस सदर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविली होती. ही गुरुवारी सकाळी सात वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन सुखरूप पोहोचली. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी नंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. या या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी वारंवार प्रयत्न करून शासनापर्यंत प्रशासनापर्यंत हा विषय पोहोचविला होता. सोळाशे किलोमीटर प्रवास करून हे सर्व विद्यार्थी स्व जिल्ह्यात सुखरूप पोहोचले आहेत.