राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस व इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:29+5:302021-07-07T04:42:29+5:30
बुलडाणा : भाजप प्रणित केंद्र सरकारने सातत्याने गॅस सिलिंडरच्या किमतीत १ जुलै पासून अचानकपणे २५ रुपयांनी वाढ केली़ त्यामुळे ...
बुलडाणा : भाजप प्रणित केंद्र सरकारने सातत्याने गॅस सिलिंडरच्या किमतीत १ जुलै पासून अचानकपणे २५ रुपयांनी वाढ केली़ त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून महिला वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. गॅससोबतच केंद्र सरकारने गेल्या २-३ महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. पेट्रोल साठी शंभरच्यावर पैसे मोजावे लागत आहेत. तसेच डिझेल सुद्धा ९५-९७ रुपये आहे. इंधन दरवाढीचा बुलडाणा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशान्वये ॲड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन बुलडाणा तालुकाध्यक्ष डी.एस. लहाने व शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांनी केले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, उपाध्यक्ष मनोज दांडगे, सुमित सरदार, पी.एम. जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष महेश देवरे, प्रा. अमोल वानखेडे, समाज कल्याण सभापती पूनमताई राठोड, प्रभाताई चिंचोले, नाझिमा खान, निर्मलाताई तायडे, सत्तार कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दत्तू टेकाळे, राजू गवई, समाधान जाधव, ॲड. गायकवाड, श्रीराम सुसर, विठ्ठलराव मोरे, अनुजा सावळे, निर्मलाताई तायडे, नरेश शेळके, नाझिमा खान, पी.एम. जाधव, सुमित सरदार यांनी मनाेगत व्यक्त केले.
यावेळी विशाल सोनुने, गौरव देशमुख, नीलेश देठे, किरण पाटील, दिनकर पांडे, जगन कानडजे, विशाल फदाट, विजय बावस्कर, ॲड. गायकवाड, नीलेश गाडेकर, संदीप तायडे, राजेश गवई, अनिल माळी, डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, विठ्ठलराव मोरे, राजू पाटील, तुळशीराम काळे, मंगेश बिडवे, अतुल लोखंडे, अमोल सोनुने, शिवा गाडेकर, किशोर बोरखडे, महेंद्र कड, संदीप उगले, सचिन भालेराव, सुरेंद्र जवरे, गणेश बाहेकर, एस.टी. सोनुने, गणेश नरवाडे, रियाज मिर्झा, युनूस बेग, निंबाजी काळवाघे, सुनील सोनुने, विष्णू सिरसाट, शरद ताठे, रिजवाना समद, विजेता पवार,अनिल अंभोरे, अनिल कोळसे, गणेश शिंदे, लक्ष्मी शेळके, सुभेदार हिवाळे, अनिल माळी, रामभाऊ जुमडे, विशाल सोनुने, राजेंद्र नरोटे, जगदीश जेस्वाल, राजाभाऊ गवते, रामेश्वर चौधरी, विनोद गवई, संतोष पवार, राजू सोनुने, साहेबराव चव्हाण, गणेश मोहिते, शंकरराव राजपूत, शाम गवते, अजय गायकवाड, विनोद गायकी, अमोल सोनुने, चंद्रकांत तुपकर इ. पदाधिकारी उपस्थित होते.