राष्ट्रवादी कांँग्रेसचा सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:15 AM2017-09-27T00:15:43+5:302017-09-27T00:15:51+5:30
बुलडाणा : पेट्रोल, डिझल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ सप्टेंबर रोजी निषेध सायकल मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पेट्रोल, डिझल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ सप्टेंबर रोजी निषेध सायकल मोर्चा काढण्यात आला.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्यापेक्षा कमी होऊनदेखील केंद्र व राज्य शासनाने यावर लावलेल्या भरमसाठ करामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची लूट होत आहे. एलपीजी गॅस सिलिंडर ही सर्वसामान्यांची जीवनावश्यक बाब असून, सन २0१३ साली ३९२ प्रती सिलिंडरवरून ७८४ रुपये प्रति सिलिंडरवर दर आणून ठेवले आहेत. या सर्व प्रकारामुळे सर्व क्षेत्रात महागाईस भस्मासूर वाढला आहे. यावर शासनाने लवकरच निर्णय घेऊन सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रकार थांबवावा, अन्यथा भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी, संगीतराव भोंगळ, साहेबराव सरदार, नरेश शेळके, मंगला रायपुरे, दिनकर देशमुख, डी.एस.लहाने, अनिल बावस्कर, शंकर महाराज, संतोष रायपुरे, नंदा पाऊलझगडे, आशा पवार, नजीमा खान, लक्ष्मी शेळके, सविता बाहेकर, मंगला वायाळ, रेखा जाधव, मोमीन सर, संतोष पाटील, देवरे, उमेश अग्रवाल, तुळशीराम काळे, इम्रान कुरेशी, गंजीधर गाढे, अब्दुल मुनाफ, राजू चांदा, किशोर चांडक, भगवान शेळके, o्रीराम सुसर, सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.