‘ज्ञानगंगा’ विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:06 PM2021-07-17T12:06:35+5:302021-07-17T12:06:53+5:30

The need to accelerate the ‘Gyanganga’ expansion movement : डिसेंबर २०१९ मध्ये टीपेश्वर अभयारण्यात टी१ सी१ हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता.

The need to accelerate the ‘Gyanganga’ expansion movement | ‘ज्ञानगंगा’ विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज

‘ज्ञानगंगा’ विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  टायगर कॉरिडॉरला चालना मिळण्याच्या दृष्टीने वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या सूचनेनुसार ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ज्ञानगंगा अभयारण्याच्या विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज आहे. यासंदर्भात चालू वर्षाच्या प्रारंभी वन्यजीव विभागांतर्गत प्रयत्न झाले होते.
डिसेंबर २०१९ मध्ये टीपेश्वर अभयारण्यात टी१ सी१ हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, यासंदर्भात बारकाईने निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. त्यामुळे टायगर कॉरिडॉरला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ज्ञानगंगा अभयारण्यात प्रति चौरस कि.मी. १८.२३ तृणभक्षी प्राणी असल्याने वाघांसाठीचे खाद्य येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी वाघांच्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्य उपयुक्त असल्याबाबत तज्ज्ञांचे एकमत झाले होते.  मात्र, २० वाघांच्या रहिवासासाठी ८०० ते १०० चौ. कि.मी. क्षेत्र आवश्यक असते. 
त्यामुळे भविष्यात या पट्ट्यात वाघांचे नैसर्गिकरीत्या स्थलांतर झाल्यास त्यासाठी एक कॉरिडॉर असावे या दृष्टिकोनातून ज्ञानगंगा अभयारण्याच्या विस्तारासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुषंगाने बुलडाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यातील प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारा भाग ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट केला जावा, असा विचार समोर आला होता. त्याबाबत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. मात्र, कोरोनामुळे बदललेली परिस्थिती वनविभागांतर्गत तापलेले वातावरण या मुद्यांमुळे हा विषय मागे पडला होता. त्यास आता पुन्हा एकदा गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
 

Web Title: The need to accelerate the ‘Gyanganga’ expansion movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.