पेनटाकळी कालव्यासोबतच भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:48+5:302021-05-26T04:34:48+5:30

गेल्या दोन दिवसांपूर्वी खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाशी संबंधित अडचणी, कालव्याचे ...

Need to address land acquisition issues along with Pentakali canal | पेनटाकळी कालव्यासोबतच भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज

पेनटाकळी कालव्यासोबतच भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज

Next

गेल्या दोन दिवसांपूर्वी खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाशी संबंधित अडचणी, कालव्याचे प्रश्न, भूसंपादनाचे प्रश्न आणि तीन गावांच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे किमानपक्षी हा विषय प्रशासनाच्या लिस्टवर आलेला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पेनटाकळी प्रकल्पांतर्गत दुधा शिवारातील मुख्य कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यासोबतच प्रकल्पावरील १४ किमीच्या मुख्य कालव्यातून पाणी झिरपून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, फुटलेला हा कालवा दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यावेळी शेतकऱ्यांनी अटकाव केला होता.

पेनटाकळी प्रकल्पाद्वारे जवळपास १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रकल्प पूर्णत्वास केला असला, तरी कालव्यांची काही भूसंपादनाची प्रकरणे, तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या मुद्द्यावर प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात येऊन या प्रश्नी त्वरेने मार्ग काढण्यासंदर्भात हालचाली करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला दिले.

--तीन गावांचा प्रश्नही मार्गी लागावा--

खडकपूर्णा प्रकल्पामुळे घाणमोड, मानमोड आणि पांढरदेव या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. यातील पांढरदेवचे गावाचे पुनर्वसन हे अंशत: आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.

--बाधितांनाही नुकसान भरपाईची प्रतीक्षा--

गेल्या वर्षी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे नुकसान मोठे होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

--कालव्याची दुरुस्ती गरजेची--

पेनटाकळी प्रकल्पावरील मुख्य कालव्याची क्षमता ही ८.१८ क्युसेक आहे, पण गेल्या वर्षी २.७ क्युसेक एवढाच पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतरही कालव्याला भगडाद पडले होते. त्यामुळे प्राधान्य क्रमाने हा कालवा दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Need to address land acquisition issues along with Pentakali canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.