सुपर स्प्रेडरवर नियंत्रण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:49+5:302021-04-15T04:32:49+5:30
-मोफत उपचाराकडे दुर्लक्ष-- आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या मोफत उपचाराकडे दुर्लक्ष करत आहोत. दिवसातून दोनदा गरम पाण्याची वाफ घेतल्यास ...
-मोफत उपचाराकडे दुर्लक्ष--
आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या मोफत उपचाराकडे दुर्लक्ष करत आहोत. दिवसातून दोनदा गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोनाचे विषाणू ९० टक्के मरतात. दहा टक्के पॅरलाइज होतात. त्यामुळे या घरगुती उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाचा विषाणू नाकाच्या मागील बाजूस व घशाची जेथून सुरुवात होते, तेथे चार दिवस थांबतो. ६० डिग्री तापमान असलेली गरम पाण्याची वाफ घेतल्यास यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. जपानसारख्या राष्ट्राने यासारख्या उपायाद्वारेच यावर नियंत्रण मिळविले आहे.
--निर्जंतुकीकरण गरजेचे--
गेल्या वर्षी पालिकेतर्फे शहरी भागात निर्जंतुकीकरण केल्या जात होते. मात्र, आता त्याचा विसर पडला पडला आहे. सध्याचा विषाणू हा हवेतून पसरू शकतो. त्यामुळे निर्जंतुकीकरण केल्यास त्याचा लाभ होऊन संक्रमण रोखण्यास मदत होईल.
--सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे--
सुपर स्प्रेडर हे त्यांच्या कुटुंबासाठीही घातक ठरत आहे. वयोवृद्धांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सुपर स्प्रेडर व लक्षणे नसलेल्या मात्र कोराना संक्रमित असलेल्या तरुणांनी घरातच क्वारंटाइन राहून सामाजिक जबाबदारी पाळणे गरजेचे झाले आहे.
(डॉ.जे.बी. राजपूत, आयएमए, राज्य कार्यकारिणी सदस्य)