माणसातला खरा देव शोधण्याची गरज : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:46+5:302020-12-25T04:27:46+5:30
देऊळगाव राजा : काेराेनासारख्या महामारीच्या काळातही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देव शाेधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र ...
देऊळगाव राजा : काेराेनासारख्या महामारीच्या काळातही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देव शाेधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
देऊळगाव राजा शहरात व तालुक्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते, नीट परीक्षेतील गुणवंत, कोरोना काळामध्ये समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी, आरोग्य विभाग, पोलीस, नगरपरिषद प्रशासन तसेच पत्रकार यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, गजानन पवार, ज्येष्ठ नेते तुकाराम खांडेभराड, संतोष खांडेभराड, राजू सिरसाट, प्रा. दिलीप झोटे, पं. स. सभापती रेणुका बुरकुल, गटनेत्या सुनीता सवडे आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजू सिरसाट यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर कोल्हे व आभार काशिफ कोटकर यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, कोरोना याेद्ध्यांचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना योद्धा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.