बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली पत्रकारिता काळाची गरज : राजकुमार बडोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:12 AM2018-02-03T01:12:32+5:302018-02-03T01:12:56+5:30
खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी येथे केले.
खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी येथे केले.
मुंबई येथील वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्काराने शुक्रवारी खामगाव येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘मूकनायक’ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीच्यावतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर येथे शुक्रवारी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भारिप नेते अशोक सोनोने, विनोद राऊत, पत्रकार राजेश राजोरे, मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रथम महिला संपादिका तानूबाई बिरजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मूकनायक बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान तसेच मंदार फणसे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लघुपट स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्काराने मंदार फणसे यांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी ओमप्रकाश शेटे यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणेही झालीत. या सोहळ्याला कृउबास सभापती संतोष ताले, उपसभापती निलेश दीपके, नगरसेवक विजय वानखडे, तेजेंद्रसिंह चव्हाण, संजय शिनगारे यांच्यासह राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मूकनायक राज्यस्तरीय पत्रिकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर, संयोजक श्रीधर ढगे यांच्यासह आयोजन समितीच्या पदाधिकार्यांनी केले. संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले.