कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:31+5:302021-04-22T04:35:31+5:30
कोरोनाची लस घेण्याकरिता ग्रामीण भागातील नागरिक स्वतःहून समोर येण्यास तयार दिसत नाहीत. अनेक वेळा लोकांना समजावूनसुद्धा लोकांच्या मनातील ही ...
कोरोनाची लस घेण्याकरिता ग्रामीण भागातील नागरिक स्वतःहून समोर येण्यास तयार दिसत नाहीत. अनेक वेळा लोकांना समजावूनसुद्धा लोकांच्या मनातील ही भीती निघत नाही. ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे शहरी भागातसुद्धा लसीबाबत होणारा अपप्रचार रोखण्याकरिता आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्येसुद्धा अनेक सुशिक्षित लोकही लस घेण्याकरिता घाबरत आहेत. ज्यांनी लस घेतली आहे, तेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, असे संदेश व लसीकरणाबाबत काही अफवा ग्रामीण भागामध्ये पसरल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीबाबत योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाने याबाबत लोकांना मार्गदर्शन करून लस घेण्यास नागरिकांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. कोविड-१९ लसीकरण हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न असून, तो यशस्वी होण्याकरिता हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.