बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:12 PM2018-08-10T18:12:05+5:302018-08-10T18:14:06+5:30

बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गंत येणाºया घाटावरील ७ तालुक्यात एकूण ४८५ पुलांपैकी ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज आहे.

The need for repair of 442 bridges in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज

बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज

googlenewsNext
ठळक मुद्दे ७ तालुक्यात येणाºया एकूण ४८५ पुलांपैकी ४३ पुल सुस्थितीत आहेत. उर्वरित ४४२ पुलांच्या दीर्घायुष्यासाठी विविध दुरूस्त्या करणे आवश्यक आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गंत येणाºया घाटावरील ७ तालुक्यात एकूण ४८५ पुलांपैकी ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज आहे, त्यात अनेक पुल वळनदार घाट, खोल दºयातील रस्त्यावर असून बहुतांश पुलाच्या किरकोळ दुरूस्तीचा समावेश आहे. पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमिवर घाटावरील ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात घाटावरील सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गंत येणाºया घाटावरील ७ तालुक्यात येणाºया एकूण ४८५ पुलांपैकी ४३ पुल सुस्थितीत आहेत. तर उर्वरित ४४२ पुलांच्या दीर्घायुष्यासाठी विविध दुरूस्त्या करणे आवश्यक आहे. त्यात अनेक पुल वळणदार घाट तसेच खोल दºयातील रस्त्यावरील पुलांचा समावेश आहे. या पुलांवर कठडे बसविणे, पेवर ब्लॉक बसविणे, पाईपलावणे आदी दुरूस्तीची कामे करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची दुरस्ती करण्याची गरज असलेल्या पुलांमध्ये ६ मिरटचे २०४ पुल, ६ ते ३० मिटर पर्यंत असलेले २३९ पुल, ३० ते ६० मिटरचे ३५ व ६० ते २०० मिटरचे ७ पुलांचा समावेश आहे. दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अशा अनेक पुलापैकी काही पुलांवर कामे सुरू आहेत. तर काही पुलांवर दुरूस्तीचे कामे सुरू करण्याची गरज आहे. लहान-मोठे दुरूस्तीच्या कामाअभावी दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे पुलांच्या दुरूस्तीची कामे त्वरित पुर्ण करण्याची मागणी होत आहे.

पाच ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना

घाटावरील सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गंत येणाºया पाच ब्लॅक स्पॉटवर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. अनेकदा या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यात राष्ट्रीय महामार्गाअंतर्गंत सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन, सावरगाव माळ, मोती तलाव व राहेरी येथील पुल येत आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गंत केळवद येथे बीओटी तत्त्वावरील पुलाचा समावेश आहे. याठिकाणी स्पीड ब्रेकर व दिशादर्शक नामफलक लावण्यात आले असून सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत

Web Title: The need for repair of 442 bridges in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.