कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:04 AM2021-02-18T05:04:27+5:302021-02-18T05:04:27+5:30
--१९ हजार डोस उपलब्ध-- जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १९ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ७,७९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना हे ...
--१९ हजार डोस उपलब्ध--
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १९ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ७,७९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना हे डोस देण्यात आलेले आहेत. साठा उपलब्ध आहे. पण हे लसीकरण अन्य लसीकरणाच्या तुलनेत वेगळे व वेळखाऊ आहे. त्यासोबत सतर्कताही त्यात अधिक ठेवावी लागते. तसेच या लसीचे तापमानही २ ते ८ अंश सेल्सियसदरम्यान मेन्टेन ठेवावे लागते. त्यामुळे शीतकरण साखळीची यात मोठी भूमिका आहे. यासह काहींमध्ये लसीकरणाबाबत भीती असून, जिल्ह्यात प्रत्यक्षात १३ केंद्रांवरच सध्या लसीकरण होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंद आहे.
--१५ दिवसांत ९७१ बाधित--
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ९७१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. अद्यापही जिल्ह्यात हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सनाच लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर दुर्धर आजार असणारे, लहान बालके व अन्य नागरिकांना लसीकरण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.
३२३ जणांना जिल्ह्यात रोज लस दिली जाते.
७,७९९ जणांना आतापर्यंत जिल्ह्यात लस दिली.