कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:18+5:302021-03-27T04:36:18+5:30
दरम्यान सध्या बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार डोस उपलब्ध असून आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कस, आरोग्य कर्मचारी, यांच्यासह अन्य असे मिळून जवळपास ...
दरम्यान सध्या बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार डोस उपलब्ध असून आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कस, आरोग्य कर्मचारी, यांच्यासह अन्य असे मिळून जवळपास ७५ हजार ५६१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचा मंद असलेला वेग आता वाढण्याची शक्यता असून दररोज सरासरी ५ हजार व्यक्तींना कोरोनाची लस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या ही अधिक असल्याचे जाणवत असून जवळपास तीन हजार नागरिकांना सध्या कोरोनाची दररोज लस दिल्या जात असल्याचे चित्र आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ७२ शासकीय केंद्रावर आणि १६ खासगी रुग्णालयातील केंद्रावर असे ८८ केंद्रावर लसीकरण करण्यात येत असून येत्या काळात ही केंद्रांची संख्या दुपटीने वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
--४.४२ लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण--
बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या आसपास आहे. यापैकी ३ लाख ८५ हजार ३४९ नागरिक हे ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहे तर ५६ हजार ८०० नागरिक हे सध्या दुर्धर आजाराने जिल्ह्यात ग्रस्त आहे. एकंदरी ४५ वर्षावरील व्यक्तींना १ एप्रिल पासून लसीकरण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करावे लागणार आहे.
-- ६० हजार डोस उपलब्ध--
जिल्ह्यात सध्या ६० हजार डोस उपलब्ध आहे. तुर्तास लसीचा तुटवडा जिल्ह्यात नाही. मात्र आगमी काळात कोरोना लसीकरणाचा वाढता वेग पाहता आणखी डोसची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने लसीच्या डोसची मागणी केली असल्याची माहिती लसीकरण मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. नेमकी किती डोसची मागणी केली आहे, हे सुत्रांनी सांगण्यास नकार दिला. दरम्यान येत्या काळात लसीकरणाच्या दृष्टीने कॅम्पही घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत असून तशी प्रशासकीय वर्तळात चर्चा होत आहे.
--या प्रमाणे झाले लसीकरण--
कर्मचाऱ्यचा प्रकार पहिला डोस दुसरा डोस एकूण
हेल्थ वर्कर्स १२८०५ ५१०८ १८,२६३
फ्रन्टलाईन वर्कर्स ०९५०८ २०४२ ११,५५०
४५-५९ वयोगट १०,६५७ ०००५ १०६६२
६० वर्षावरील ४२,५९१ ०००५ ४२,५९६