जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:41+5:302021-05-06T04:36:41+5:30

--सपकाळांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष-- लसीकरणाच्या या संभाव्य गोंधळाचा मुद्दा बुलडाण्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या ...

The need for a strategic decision regarding the second dose in the district | जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज

जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज

googlenewsNext

--सपकाळांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष--

लसीकरणाच्या या संभाव्य गोंधळाचा मुद्दा बुलडाण्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. लसीकरण मोहिमेचे संपूर्ण स्टॅटेस्टीकच त्यांनी ५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली असून आरोग्य विभागाला यासंदर्भात त्वरेने हालचाली करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहली तर पहिला डोस घेतलेल्या अडीच लाख लोकांच्या दुसऱ्या डोस नेमका कधी द्यावा, याचा प्रश्न निर्माण होईल, हेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

-- ७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठी--

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना उपलब्ध डोसपैकी ७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठी वापरण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, निर्माण झालेली तफावत ही मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसलाच प्राधान्य देण्याची गरज सध्या असल्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे आठवड्यातील दोन दिवस दुसऱ्या डोससाठी ठेवण्याबाबतही प्रशासनस्तरावर सध्या विचार मंथन सुरू आहे.

--दुसरा डोस आवश्यक--

कोरोना प्रतिबंधासाठी लसीचा दुसरा डोस आवश्यक आहे. पहिला डोस कोविशिल्ड असले तर दुसऱ्या डोसचे दोन महिन्यांचे अंतर चालेल, परंतु इतर डोस असले तर एक आठवड्याचा विलंब चालू शकतो, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दुसरा डोसचे नियोजनही प्रशासनास आता प्राधान्यस्तरावर करावे लागणार आहे.

Web Title: The need for a strategic decision regarding the second dose in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.