समस्या सोडविण्यासाठी एकजूट आवश्यक- डांगे
By Admin | Published: May 30, 2017 01:13 AM2017-05-30T01:13:20+5:302017-05-30T01:13:20+5:30
खामगाव येथे धनगर समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजात संघटन आणि एकजुटीचा अभाव आहे. त्यामुळे समाजात समस्या वाढीस लागल्या असून, या समस्यांचा नायनाट करण्यासाठी एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन धनगर महासंघाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी येथे केले.
लोकमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात धनगर समाजाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नाना कोकरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, शरद वसतकार, डॉ. अलका गोडे, पुष्पा गुलवाडे, भारत वाघ, शत्रुघ्न पाचपोर, अरूण देवकते, कृउबास संचालक अशोक हटकर, शांताराम बोधे, वर्षा गुरव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना श्रीराम पुंडे यांनी धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत स्तरावर विजयी झालेल्या समाजातील लोकप्रतिनिधींसह शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याला तुळसाबाई वाघ, प्रभाकर वरखेडे, साहेबराव फासे, सुखदेव कवळकार, संगीता पांढरे, ज्योती कचरे, कल्पना वसतकार, आनंद हागारे, अनंता बोरसे, सारंगधर नवलकार, कैलास डांगे, श्रीकृष्ण बोरसे, गजानन गुरव, रंजना बोरसे, संतोष टाले, रवींद्र गुरव, आनंद नागे, नामदेव बाजोडे, संतोष ढेकळे, गणेश वरखडे, आदींची उपस्थिती होती.