‘नेरी’ करणार लोणारच्या पाण्याची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:11 AM2020-06-11T08:11:24+5:302020-06-11T08:11:41+5:30
सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.
नीलेश जोशी
बुलडाणा : आगळे वेगळे महत्त्व असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याला लालसर रंग आल्याच्या पार्श्वभूमीवर आता वन्य जीव विभाग नागपूर येथील नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरकडे सरोवरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणार आहे. हे पाणी नेमके लाल होण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी जुने संशोधन अहवालही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासण्यास सुरुवात केली आहे.
गत काही दिवसांपासून लोणार सरोवरातील पाणी हे लालसर रंगाचे दिसण्यास सुरुवात झाली होती. नऊ जून रोजी ते ठळकपणे दिसण्यास प्रारंभ झाला होता. हेलोबॅक्टेरिया व ड्युनेलिया सलीना नावाच्या कवक अर्थात बुरशीची खाºया पाण्याच्या या सरोवरात वाढ झाल्याने कॅरोटेनाईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवल्यामुळे पाण्याचा रंग लालसर झाला असावा, असा कयास प्रा. डॉ. सुरेश मापारी यांनी व्यक्त केला होता. सोबतच ग्लोबल वार्मिंगशीही याचा संदर्भ वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा जोडत आहेत.
दुसरीकडे स्थानिक जुन्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार साधारणत: पावसाळ््याच्या सुरुवातीला सरोवरातील पाण्याचा यापूर्वी असा लालसर रंग झाल्याचे सांगितले जाते, असे वन विभागातील एका अधिकाºयाने सांगितले.
सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.
- मनोजकुमार खैरनार, विभागीय वन अधिकारी, वन्य जीव विभाग
उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार येथील खाºया पाण्याच्या सरोवरातील पाण्याचा रंग अचानक लालसर झाला आहे. हेलोबॅक्टेरिया आणि ‘ड्युनोलिला सलीना’ कवकाची (बुरशी) खाºया पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवतो. त्यामुळे पाणी लालसर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.