ऑनलाइन शिक्षणात नेटवर्कचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:10+5:302021-07-10T04:24:10+5:30
डाेणगाव : काेराेनामुळे शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, मात्र गत काही दिवसांपासून मोबाइलला नेटवर्कच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह ...
डाेणगाव : काेराेनामुळे शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, मात्र गत काही दिवसांपासून मोबाइलला नेटवर्कच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नेटवर्कची समस्या दूर करावी, अशी मागणी हाेत आहे.
गत वर्षापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशातच गत काही दिवसांपासून मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी त्रस्त आहेत. नेटवर्क नसल्याने फाेन काॅलवरील संभाषण अर्धवट राहत आहे. ट्रायच्या नियमानुसार मोबाइलधारकांना नेटवर्क देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र, डोणगावमध्ये कोणत्याच कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक मेटाकुटीस आला आहे.
कंपनी बदलूनही त्रास कायम
डाेणगाव परिसरातील नेटवर्कच्या समस्येला कंटाळून अनेकांनी सीम कार्डची कंपनी बदलून घेतली, मात्र समस्या जैसे थे असल्याने विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
खर्च गेला व्यर्थ
ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक पालकांनी महागडे स्मार्टफोन विकत घेतले, तसेच विविध कंपन्यांचे महागडे रिचार्ज केले, मात्र नेटवर्कच मिळत नसल्याने हा खर्च व्यर्थ जात असल्याचे चित्र आहे. एका दिवसासाठी एक जीबी नेटची मर्यादा आहे. नेटवर्क मिळत नसल्याने ते वापरताच येत नसल्याचे चित्र आहे.