चिखली येथे नवीन सिंचन विभागाची निर्मिती करण्यात यावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:33 AM2021-02-13T04:33:54+5:302021-02-13T04:33:54+5:30
सध्या अस्तित्वात असलेल्या विभागांतर्गत सुमारे ७५० पैकी ४० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. खडकपूर्णा, पेनटाकळी या मोठया प्रकल्पासह ...
सध्या अस्तित्वात असलेल्या विभागांतर्गत सुमारे ७५० पैकी ४० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. खडकपूर्णा, पेनटाकळी या मोठया प्रकल्पासह अनेक मध्यम व लहान प्रकल्प मिळून जवळपास ६५ प्रकल्प आहेत. घाटावरील ६ तालुक्यांमध्ये जवळपास ६७ हजार ४० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मिती झाली आहे, तसेच मेहकर, दे.मही, चिखली येथे उपविभाग अस्तित्वात आहेत. तर लघु पाटबंधारे विभाग क्र २ चिखली हा चिखली येथून जिगांव प्रकल्पाच्य कामाकरिता हलविण्यात आला आहे. त्यामुळे या विभागाची इमारत रिक्त आहे. या इमारतीमध्ये नवीन व्यवस्थापन विभाग सुरु करणे शक्य आहे. कोणत्याही अतिरिक्त खर्चाची गरज नाही, तसेच सिंचन उपविभाग अस्तित्वात असल्यामुळे घाटावरील ६ तालुक्यांसाठी चिखली या मध्यवर्ती ठिकाणी नवीन व स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याची मागणीही भारत बोंद्रे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.