सुलतानपूर येथे विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:34 IST2018-01-11T00:32:57+5:302018-01-11T00:34:42+5:30
सुलतानपूर (बुलडाणा): येथील एका नव विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १0 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. अनुराधा सुनील गव्हाणे (१९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्मह त्या केली, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.

सुलतानपूर येथे विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर (बुलडाणा): येथील एका नव विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १0 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. अनुराधा सुनील गव्हाणे (१९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्मह त्या केली, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.
नऊ महिन्यांपूर्वी अनुराधाचा विवाह झाला होता; परंतु १0 जानेवारीला तिने गावाशेजारील खोडी शिवारातल्या शेख युसूफ यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. मेहकर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महिलेचे पार्थिव मेहकर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास बीट जमादार सोनुने, सानप हे करीत आहेत.