बुलडाणा येथे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नविन गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:15 PM2018-01-08T15:15:40+5:302018-01-08T15:16:38+5:30

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यां साठी शनिवारला नविन गणवेश वाटपाचा कार्यक्रम विभागीय कार्यालय रा.प.बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला होता.

New uniform for the employees of Transport Corporation at Buldana | बुलडाणा येथे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नविन गणवेश

बुलडाणा येथे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नविन गणवेश

Next
ठळक मुद्देरा.प.महामंडळाच्या विविध योजनांचे सादरीकरण प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना दाखविण्यात आले.

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यां साठी शनिवारला नविन गणवेश वाटपाचा कार्यक्रम विभागीय कार्यालय रा.प.बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रापचे अनिल म्हेतर, विभाग नियंत्रक तर प्रमुख पाहुणे जालींदर बुधवत, संजय गायकवाड, विजय जायभाये हे उपस्थित होते. यावेळी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधिर चेके पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम रा.प.महामंडळाच्या विविध योजनांचे सादरीकरण प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना दाखविण्यात आले. त्यामध्ये अद्ययावत बसस्थानके, कर्मचारी विश्रांतीगृह, प्रवाशी निवारे, चित्रपट गृहे, बसस्थानके आगार व बसेसची अद्ययावत स्वच्छता, याचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांच्याहस्ते विविध संवर्गातील २१ रा.प. कर्मचाºयांना गणवेश वाटप जालींधर बुधवत, संजय गायकवाड, अनिल म्हेतर यांच्याहस्ते करण्यात आले. जळगाव जामोदचे चालक हरिभाऊ लोणकर यांनी येरळी पुलावरील बससोबतच्या मालवाहतूक वाहनाच्या अपघातात प्रवाशांच्या सुरक्षीतेत कर्तव्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार जालींदर बुधवत यांनी केला. या कार्यक्रमात सर्व संघटनांचे प्रतिनिधी, रा.प.चे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभागीय भांडार अधिकारी प्रदिप पाचपवार व विभागीय भांडारातील पर्यवेक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: New uniform for the employees of Transport Corporation at Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.