चंद्रज्याेतीच्या बिया खाल्ल्याने नऊ मुलांना विषबाधा; मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील घटना
By संदीप वानखेडे | Published: September 17, 2023 11:05 PM2023-09-17T23:05:36+5:302023-09-17T23:07:05+5:30
मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील काही मुले गावाच्या बाहेर खेळत हाेती. या मुलांना प्रसाद म्हणून गावातील महिलेने चंद्रज्याेतीच्या बिया दिल्या.
बुलढाणा : चंद्रज्याेतीच्या बिया खाल्ल्याने नऊ मुलांना विषबाधा झाली. ही घटना १७ सप्टेंबर राेजी सायंकाळी मलकापूर तालुक्यातील कुंडा येथे घडली. या सर्व मुलांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील काही मुले गावाच्या बाहेर खेळत हाेती. या मुलांना प्रसाद म्हणून गावातील महिलेने चंद्रज्याेतीच्या बिया दिल्या. या बिया खाल्ल्याने ९ मुलांना उलट्या हाेऊ लागल्या. ही मुले घरी आल्यानंतर पालकांनी कशामुळे हाेत आहे, तसेच काय खाल्ले, अशी मुलांना विचारणा केली असता त्यांनी चंद्रज्याेतीच्या बिया दाखवल्या. पालकांनी तातडीने या मुलांना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून या मुलांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या मुलांची प्रकृती धाेक्याबाहेर असून, उपचार सुरू आहेत.
या मुलांना झाली विषबाधा
भाग्यश्री श्रीकृष्ण कांडेलकर (वय १२), साेहम निनाद तायडे (१०), नम्रता सुरेश बावस्कर (८), दिव्या संताेष कांडेलकर (१०), समर्थ सुरेश बावस्कर (२.५), वैष्णवी रमेश बावस्कर (१०), श्रेया रमेश बावस्कर (५), रिया सुरेश बावस्कर (६) आणि श्रेया अशाेक कांडेलकर (८) आदींना विषबाधा झाली आहे. या मुलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.