बुलडाणा जिल्ह्यातील नऊ पिके विम्याच्या कक्षेत

By admin | Published: July 8, 2016 12:32 AM2016-07-08T00:32:22+5:302016-07-08T00:32:22+5:30

३१ जुलै पीक विमा भरण्याची अंतिम मुदत, कर्जदार शेतक-यांना पीक विमा बंधनकारक.

The nine crops in Buldhana district are under insurance | बुलडाणा जिल्ह्यातील नऊ पिके विम्याच्या कक्षेत

बुलडाणा जिल्ह्यातील नऊ पिके विम्याच्या कक्षेत

Next

बुलडाणा : खरीप हंगाम २0१६ साठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. पीक विमा भरण्याची ३१ जुलै अंतिम मुदत असून, कर्जदार शेतकर्‍यांना पीक विमा बंधनकारक करण्यात आला आहे.
या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखून कृषी क्षेत्राच्या पतपुरवठय़ात सातत्य राखता येणार आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकार्‍यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पीक विमा बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकर्‍यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के र्मयादित ठेवण्यात आला आहे. विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत आहे.

Web Title: The nine crops in Buldhana district are under insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.