खडकपूर्णा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:25 PM2020-08-01T16:25:58+5:302020-08-01T16:26:09+5:30
धरणाचे ९ वक्रद्वार २० सेमीने उघडण्यात आले असून १८३ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:खकडपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस सुरू असल्याने जलसाठा ७० टक्यांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे, १ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता धरणाचे ९ वक्रद्वार २० सेमीने उघडण्यात आले असून १८३ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गत काही दिवसांपासून दमदार पाउस सुरू आहे. त्यामुळे खकडपूर्णा प्रकल्पातल जलसाठा ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी काठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. गौताळा अभयारण्यातून उगम पावणाऱ्या खडकपूर्णा नदीवरी या प्रकल्पामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या आसपास नियंत्रीत ठेवण्याचे निर्देश आहे. सोबतच धरण सुरक्षा नियमामध्येही तशी तरतुद असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या खडकपूर्णा प्रकल्पाचे नऊ वक्र दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले असून त्यातून सहा हजार ४६२ क्युसेक (१८३ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथळी भरुन वाहत आहे.