माळेगावचे नऊ उपोषणकर्ते रुग्णालयात!

By admin | Published: February 12, 2016 02:03 AM2016-02-12T02:03:12+5:302016-02-12T02:03:12+5:30

८ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरू आहे बेमुदत उपोषण.

Nine fasteners of Malegaon hospital! | माळेगावचे नऊ उपोषणकर्ते रुग्णालयात!

माळेगावचे नऊ उपोषणकर्ते रुग्णालयात!

Next

बुलडाणा : माळेगाव वनग्राम येथे विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या, या मुख्य मागणीसाठी भूमीहक्क परिषदेच्या वतीने ८ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी नऊ उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोताळा तालुक्यातील माळेगाव वनग्राम, तरोडा, जयपूर, वारुळी, गुळभेली, खडकी, नळकुंड, रोहीणखेड येथे वन व महसूल जमीन अतिक्रमकांना जमिनीचा वनहक्क व कायम पट्टे देण्यात यावे, खैरखेड येथील रेती चोरी प्रकरणाची चौकशी करावी, माळेगाव वनग्रामला महसुली दर्जा मिळावा, तसेच सर्व यासह विविध मागण्यांबाबत भूमीहक्क परिषदेच्या ७५ सदस्यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा चौथा दिवस उजाडल्यानंतरही प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांनी उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी, आज अंजना गायकवाड, फुलकौर पिंपळे, गुंफा गायकवाड, तुळसा बरडे, तुळशिराम बरडे, सखाराम बरडे, राजाराम मोरे, रामकृष्ण माळी, श्रीराम धुरंधर या नऊ उपोषणकर्त्यांंना आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

Web Title: Nine fasteners of Malegaon hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.