नऊ हजार शेतक-यांनी घेतली आंतरपट्टी पिके!

By admin | Published: January 16, 2017 02:03 AM2017-01-16T02:03:55+5:302017-01-16T02:03:55+5:30

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांचे उत्पादनवाढीसाठी प्रयत्न.

Nine thousand farmers took intercultural crops! | नऊ हजार शेतक-यांनी घेतली आंतरपट्टी पिके!

नऊ हजार शेतक-यांनी घेतली आंतरपट्टी पिके!

Next

बुलडाणा, दि. १५- कुठल्याही एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच शेतजमिनीवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेऊन जास्तीजास्त उत्पन्न घेता येते, या उद्देशाने सोयाबीनबरोबर तूर, किंवा कापसाबरोबर मूग असे पीक शेतकर्‍यांकडून घेतले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी जवळपास नऊ हजार शेतकर्‍यांनी अशी प्रात्यक्षिके केली आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मूलद्रव्ये व्यवस्थापन तसेच अवजारे पुरवठा या घटकांचा अंतर्भाव होता.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) हे अभियान २0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविले जात आहे. यात सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनु.जमातीमधील १ लाख ६ हजार ४८२ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. यात एका पिकावर अवलंबून न राहता, एकाच हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५00 शेतकर्‍यांनी शेतजमिनीवर आंतरपट्टी व आंतरपिके घेतली आहेत.

Web Title: Nine thousand farmers took intercultural crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.