नऊ हजार विद्यार्थ्यांंच्या दप्तराची तपासणी
By admin | Published: September 1, 2016 02:29 AM2016-09-01T02:29:20+5:302016-09-01T02:29:20+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे झाले जड.
गणेश मापारी
खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३१: विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ८ हजार ९२६ विद्यार्थ्यांंच्या दप्तराची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ८९९ विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे निकषापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.
दप्तराचे वजन विद्यार्थ्यांंच्या वजनाच्या तुलनेत १0 टक्क्यापेक्षा अधिक असू नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या ३0 टक्क्यापेक्षा जास्त आढळून आले आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांंना पाठदुखीचा त्रास होणे, मणक्याची झीज होणे, थकवा येणे यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांंंच्या द प्तरांची तपासणी करण्यात येते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंंचे सरासरी वजन ठरवून त्यानुसार विद्यार्थ्यांंंच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे अपेक्षि त वजन ठरविण्यात आले आहे. दप्तराचे वजन ठरविलेल्या निकषानुसार आहे किंवा नाही, यासाठी विद्यार्थ्यांंंच्या दप्तराची तपासणी करण्यात येत आहे.
यावर्षीही बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शासकीय व खासगी शाळांमधील ८ हजार ९२६ विद्यार्थ्यांंंच्या दप्तराची तपासणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. यापैकी ८९९ विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे वजन निकषापेक्षा अधिक आढळून आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
दप्तराचे अपेक्षित वजन
इयत्ता पहिली २0१0 ग्रॅम इयत्ता पाचवी३१९५ ग्रॅम
इयत्ता दुसरी२२३५ ग्रॅम इयत्ता सहावी३२९५ ग्रॅम
इयत्ता तिसरी २५0५ ग्रॅम इयत्ता सातवी३७८५ ग्रॅम
इयत्ता चौथी२८३0 ग्रॅम इयत्ता आठवी४२४५ ग्रॅम