नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:26 AM2018-02-25T00:26:08+5:302018-02-25T00:26:08+5:30

मलकापूर : नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. काका-पुतणीच्या पर्यायाने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ नराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत.

Nine-year-old girl filed an offense on sexual assault | नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमलकापूर तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथील घटनानराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. काका-पुतणीच्या पर्यायाने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ नराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत.
यासंदर्भात पीडित नऊ वर्षीय बालिकेच्या आईने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यात नमूद केले आहे, की जवळच्या नात्यात असलेल्या सुनील हरसिंग चव्हाण (वय ३८, रा. धोंगर्डी) याने दारूच्या नशेत बालिकेवर लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य करण्याचा वारंवार प्रयत्न केला. 
हा प्रकार कुणास सांगू नये म्हणून तो त्यासाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत असे. पीडित बालिकेने मात्र तिच्या आजीजवळ त्याबाबतचे कथन केल्याने ‘त्या’ बालिकेच्या आईने मलकापूर एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सुनील हरसिंग चव्हाण याच्याविरुद्ध अप.नं. २२/१८ कलम ३५४, ५0४, ५0६ भादंविसह कलम ४, ८ बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक माधवराव गरूड तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अलीकडील काळात अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, अशांना जबर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: Nine-year-old girl filed an offense on sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.